चोपडा, राजकीय

मनूदेवीच्या आशिर्वादाने अपक्ष उमेदवार माधुरी पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

शेअर करा !

madhuri news

चोपडा(प्रतिनिधी)। चोपडा विधानसभेच्या अपक्ष उमेदवार माधुरी पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ चोपडा व यावल मतदारसंघातील आराध्य दैवत मनुदेवी माता, आडगाव-कासारखेडा येथे नारळ वाढवून करण्यात आला.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

मतदार संघातून स्वइच्छेने आलेल्या कार्यकर्त्यांचा साक्षीने व मनूदेवी मातेच्या आशीर्वादाने प्रचार नारळाचा शुभारंभ कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. माधुरी पाटील यांचे मतदार संघासाठी दिलेले योगदान हे आम्ही बघितले असून त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशा भावना व्यक्त करीत मनूदेवी मातेच्या साक्षीने माधुरी किशोर पाटील यांना विजयी करण्याचा यावेळी मतदारांनी संकल्प केला. तालुक्यातील राजकीय दलाली वृत्तीला रोड रोलरच्या साह्याने गाडण्याचा संकल्प देखील आलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. माधुरी पाटील यांना मताधिक्याने निवडून आणण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली. यामध्ये विशेष बाब म्हणजे माधुरी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते सोशिअल मीडियाच्या माध्यमातून आलेले होते. स्वेच्छेने आलेल्या या कार्यकर्त्यांमुळे माधुरी किशोर पाटील या निवडून येणार हे मात्र निश्चित आहे.