राष्ट्रीय, सामाजिक

महिलांना मोफत प्रवास, दिल्ली सरकारचा निर्णय

शेअर करा !

 

metro

 

दिल्ली (प्रतिनिधी) : दिल्ली सरकारने महिलांसाठी बस आणि मेट्रोचा प्रवास मोफत केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, “दिल्ली परिवहन मंडळाच्या बस, क्लस्टर बसेस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार. जेणेकरुन महिला सुरक्षित प्रवास करु शकतील. तसंच वाढीव तिकिट दराची चिंता न करता आपल्याला बस किंवा मेट्रो ज्याने हव्या त्या पर्यायाने प्रवास करु शकतात”. याशिवाय शहरात ७० हजार सीसीटीव्ही लावले जाणार असल्याचंही केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

advt tsh 1

मात्र, ज्या महिलांनी तिकीट दर परवडतात, ज्यांना तिकीट खरेदी करणं शक्य आहे त्यांनी याचा लाभ घेऊ नये अशी विनंती केली आहे. ‘अशा अनेक महिला आहेत ज्यांना मेट्रो किंवा बसने प्रवास करणं परवडतं. ज्यांनी तिकीट खरेदी करणं शक्य आहे, त्यांनी याचा लाभ घेऊ नये. आम्ही आवाहन करतो ज्यांना शक्य नाही आश्यांनीच तिकीट खरेदी करावं. ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांना लाभ घेऊ द्यावा’. यावेळी असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.