क्राईम, चाळीसगाव

चाळीसगावात महिलेचा निर्घृण खून

शेअर करा !

chalisgaon newd

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील नालंदा विद्यालयाच्या शेजारी भाड्याच्या घरात राहणाऱ्या 50 वर्षीय महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे चाळीसगावात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून पंचनाम्याचे काम सुरू आहे.

advt tsh 1

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील डेअरी भागातील शिंगाटे मळा व नालंदा विद्यालयाच्या शेजारी राहणारे घरमालक पंडीत हिलाल शिंगटे यांच्या घरात पमाबाई वाल्मिक शेवाळे (वय-50) ह्या आपल्या पती व मुलगासह भाड्याने राहतात. सोमवारी पमाबाई यांचे पती वाल्मिक शेवाळे हे मुलीच्या मुलांना (नातेवंडे) येवला जि.नाशिक येथे पोहचविण्यासाठी गेले होते. सकाळपासून घराचा दरवाजा उघडाच होता. दुपारी 2 वाजेच्या सुमारास घरमालक पंडीत शिंगटे यांची पत्नी स्वयंपाकासाठी कढीपत्ता घेण्यासाठी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घराचा पडदा ढकलून पाहिले असता त्यांना पमाबाई शेवाळे रक्तबंबाळ अवस्थेत मृत झालेले आढळले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान ज्याठिकाणी महिलेचा कुऱ्हाडीने हत्या केली त्याठिकाणी कुऱ्हाड आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली आहे. पमाबाई यांचा खून कोणत्या कारणामुळे व कोणी केला असावा याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

पोलीसांची घटनास्थळी धाव
महिलेचा खून झाल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, डीवायएसपी उत्तम कडलग, पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड, ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, पीएसआय सुधीर पाटील, पीएसआय मछिंद्र रणमाळे, पीएसआय राजेश घोडवे, एपीआय सुरेश शिरसाड, हेकॉ बापू भोसले, सुधिर पाटील, राजेश घोडवे आदी कर्मचारी उपस्थित होते.

श्वान पथकाला पाचारण
घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मयत महिलेचा मुलगा समाधान शेवाळे वय २५ हा सकाळपासूनच घरी नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याला शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे.