जळगाव, सामाजिक

महसूल कर्मचाऱ्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

collector office

जळगाव प्रतिनिधी । महसूल कर्मचाऱ्‍यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाकडुन दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने शासन महसूल कर्मचाऱ्‍यांची फसवणूक करीत असल्याने महसुल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

  • advt atharva hospital
  • advt tsh 1
  • Online Add I RGB
  • vignaharta
  • new ad

निवेदनात म्हटले आहे की, महसूल प्रशासनाच्या वेळोवेळी बैठका झाल्या आहेत. सदर बैठकांमध्ये संघटनेच्या काही मागण्या तत्वत: मान्य केलेल्या आहेत. परंतु मान्य केलेलया मागण्यांना 6 वर्षांचा कालावधी होवूनही त्याबाबत शासनाकडून अद्यापपावेतो कोणताही शासननिर्णय निर्गमीत झालेला नाही. शासनाने संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांनुसार तातडीने शासननिर्णय निर्गमीत करावे अथवा यापूर्वी स्थगीत केलेले आश्वासन पुन्हा सुरु करावे लागेल असा ठराव 30 जून 2019 रोजी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच पुणे येथील बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला आहे. तथापी शासनाने याबाबत त्वरीत कार्यवाही न केल्यास संघटनेच्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पहीला टप्पा म्हणून जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आज 11 जुलै 2019 रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना निवेदन देण्यात आले. तसेच दुपारच्या जेवणाच्या सुटीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, निदर्शने करण्यात आले व सदर आंदोनाची माहिती देणारे फलक (बॅनर) लावण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्रसिंह परदेशी, कार्याध्यक्ष- योगेश नन्नवरे, सरचिटणीस – अमोल जुमडे, मार्गदर्शक- देवेंद्र चंदनकर, महिला प्रतिनिधी- छाया तडवी, नम्रता नेवे, प्रिया देवळे, रेखा चंदनकर तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.