चोपडा, राजकीय

महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सुगीचे दिवस येणार : अरुणभाई गुजराथी

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

arunbhai gujarathi

चोपडा प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला पाहिजे तसे यश मिळाले नाही. परंतू कार्यकर्त्यांनी न खचून जाता जोमाने कामाला लागले पाहिजे.

  • vignaharta
  • Online Add I RGB
  • advt tsh 1
  • new ad

तसेच, मा. शरदचंद्र पवार यांचे विचार, दूरदृष्टी आणि शेतकऱ्यांबद्द्ल असलेले प्रेम घराघरापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचवले गेले पाहिजे. विधानसभेला निश्चितच यश आपल्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादीला मिळेल, यात शंका नाही. असे मत माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी  राष्ट्रवादी कॉग्रेसचा २०व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार जगदीश वळवी, डी.पी. साळूखे, ॲड. घनश्याम पाटील, गोरख पाटील, चंद्रहास गुजराथी, उर्मिला गुजराथी, डॉ. नीलिमा पाटील, कांचन राणे, संजय कानडे, जीवन चौधरी, आशिष गुजराथी, प्रसन्न गुजराथी, भारती बोरसें, गोकुळ पाटील, वसंतराव पाटीक, बंडू देसाई, राजेंद्र पाटील, सनी सचदेव, अक्रम तेली, सतीश बोरसे आदी मंडळी उपस्थित होते.