राज्य, राष्ट्रीय

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक

शेअर करा !

Mega block

मुंबई प्रतिनिधी । कल्याण ते ठाणे जलद मार्गावर आणि वडाळा रोड ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील लोकल आणि पश्चिम रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेस सुमारे १५ मिनिटे विलंबाने धावतील. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते वैतरणा दरम्यान शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉक होता. यामुळे पश्चिम रेल्वेवर आज दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

  • advt tsh flats
  • Sulax 1
  • spot sanction insta

ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे अप-डाऊन धीम्या लोकल फेऱ्या सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सुमारे १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत. तसेच वडाळा रोड ते वाशी स्थानकातील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी पनवेल-वाशी मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील. हार्बरवरील प्रवाशांना त्याच तिकीट-पासवरून मुख्य मार्ग आणि ट्रान्सहार्बरने प्रवास करण्याची मुभा आहे.

मध्य रेल्वे
स्थानक – कल्याण – ठाणे
मार्ग – अप जलद
वेळ – स. १०.५४ ते दु. ३.५२

हार्बर रेल्वे
स्थानक – वडाळा रोड-वाशी
मार्ग – अप आणि डाऊन
वेळ – स.११.१० ते दु.३.४०

पश्चिम रेल्वे
स्थानक – वसई रोड – वैतरणा
केव्हा- ३०नोव्हेंबर -१ डिसेंबर (मध्यरात्री )
मार्ग – अप-डाऊन जलद