ADVERTORIAL, जळगाव, ट्रेंडींग

जळगावच्या लंडन शेक्समध्ये दर्जा, स्वच्छता व स्वादाचा अनोखा मिलाफ

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम अशा लंडन शेक्सची शाखा जळगावात सुरू असून यात अतिशय दर्जेदार असे शेक्स आणि स्नॅक्स उपलब्ध करण्यात आले असून याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहेत.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

शहरातील ओंकारेश्‍वर मंदिराजवळच्या जयनगरातील प्रशस्त जागेत काही महिन्यांपूर्वीच लंडन शेक्स सुरू झाले असून याला जळगावकरांचा प्रतिसाद मिळत आहे. खरं तर लंडन शेक्स हा अतिशय जुना आणि अनेक देशांमध्ये नावलौकीक प्राप्त केलेला ब्रँड जळगावात असणे हीच मोठी बाब आहे. कारण नाशिक आणि औरंगाबाद वगळता परिसरातील कोणत्याही शहरात याची शाखा नाही. या पार्श्‍वभूमिवर, जळगावच्या लंडन शेक्समध्ये आंतराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता कायम राखण्यात आलेली आहे. याला अतिशय सुंदर, प्रशस्त आणि एयर कंडिशन्ड शॉपीची जोड देण्यात आलेली आहे. येथे तरूणाई आणि लहान-मोठे ग्रुप्स हे पार्टीजदेखील करू शकतात. याशिवाय, महिलांची किटी पार्टी, मुलांचे बर्थ-डे आदींसाठी यामध्ये आणि बाहेर विपुल जागा उपलब्ध आहे.

लंडन शेक्समध्ये अतिशय अत्युच्च दर्जाचे आणि विविध फ्लेवर्सचे शेक्स उपलब्ध आहेत. यामध्ये पारंपरीक प्रॉडक्टच्या जोडीला काही अतिशय हटके असे फ्लेवरदेखील प्रदान करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने पाणी पुरी शेकचा आवर्जून उल्लेख करता येईल. आपण नेहमीच चटकदार पाणीपुरीचा आस्वाद घेत असतो. मात्र याला पहिल्यांदाच शेकच्या स्वरूपात सादर करण्यात आले असून याला ग्राहकांची पसंती मिळालेली आहे. येथे तब्बल ३५ प्रकारचे शेक्स मिळतात. यात रेग्युलर, थीक शेक्स, न्यू अरायव्हल्स आदींचा समावेश आहे. विविध फ्लेवर्सच्या शेक्ससोबत येथे मोनिटोजदेखील उपलब्ध आहेत. यासोबत कोल्ड कॉफी, आईस्क्रीम व शीतपेयांचे सर्व प्रकारदेखील येथे सादर करण्यात आलेले आहेत.

लंडन शेक्समध्ये शेकसोबत विविध प्रकारचे स्नॅक्सदेखील उपलब्ध आहेत. यामध्ये पिझ्झा, पास्ता, सँडवीच, मॅगी, सूप आदींसह अन्य प्रकारांचा समावेश आहे. यामुळे अगदी आरामशीरपणे स्नॅक्स आणि शेकचा एकाच ठिकाणी आस्वाद घेण्याची सुविधा यातून जळगावकरांना उपलब्ध करण्यात आली आहे. येथे खूप स्वच्छता पाळण्यात आलेली आहे. यामुळे हायजीनबाबत कायम दक्ष असणार्‍यांसाठी लंडन शेक्स हे आवडीचे ठिकाण बनू शकते. याच्या जोडीला या शॉपीचे संचालक भावेश कामानी आणि त्यांचे सहकारी हे तत्पर आहेत. जळगावकरांनी लंडन शेक्ससारख्या आंतराष्ट्रीय ब्रँडला आजवर चांगला प्रतिसाद दिला असून भविष्यातही हा लोभ कायम राहणार असल्याचा आशावाद कामानी यांनी व्यक्त केला आहे. या अतिशय स्वच्छ, सुंदर, प्रशस्त आणि अद्ययावत अशा शॉपीजमधील सर्व प्रॉडक्ट हे अगदी सर्वसामान्यांना परवडणारे असल्याची बाब लक्षणीय आहे.

सध्या जळगाव हे अत्याधुनीक युगात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे. जेन नेक्स्टला आता आपल्या शहरातच विविध ट्रेंडींग हॅपनींग्जची आवश्यकता भासू लागली आहे. त्यांच्यासाठी लंडन शेक्स हे एक हक्काचे डेस्टीनेशन बनू शकते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अलीकडेच शहरात कार्यरत झालेल्या झोमॅटो या फुड डिलीव्हरी अ‍ॅपवरही लंडन शेक्सची लिस्टींग आहे. परिणामी कुणी दुरवर राहत असेल, अथवा बाहेर जाण्याचा मूड नसल्यास कुणीही झोमॅटोवरून लंडन शेक्सच्या मेन्यू कार्डमधील हवा तो पदार्थ अगदी घरपोच मिळवू शकतो. आणि २५ वा त्यापेक्षा जास्त जणांसाठी पार्टीची ऑर्डर असेल तर थेट लंडन शेक्सवालेच आपल्याला घरपोच डिलीव्हरी देऊ शकतात. अर्थात, खरी मजा येते ती लंडन शेक्समध्येच….तेव्हा एकवार अवश्य भेट द्या.

संपर्क :

द लंडन शेक्स

जयनगर रोड, ओंकारेश्‍वर मंदिराजवळ
जळगाव

पहा : द लंडन शेक्सबाबत माहिती देणारा व्हिडीओ.

गुगल मॅप्सवर पहा अचूक लोकेशन