जळगाव, शिक्षण, सामाजिक

लोकशाही दिनी जिल्हाभरातून 118 अर्ज दाखल

शेअर करा !

loksahai din new

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 118 तक्रार अर्ज दाखल झाले.

  • advt tsh flats
  • spot sanction insta
  • Sulax 1

या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने सहकार, जिल्हा परिषद, महानगर पालिका, महसुल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस व महिला व बालविकास विभाग यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे.

या जिल्हास्तरीय लोकशाही दिनास, यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक पी.पी.मोराणकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) बी. ए. बोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा अधिक्षक भूमिअभिलेख सुनिल भोंगळे, विशेष भुसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी गेल्या अकरा महिन्यातील लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जांपैकी प्रलंबित तक्रारींचा आढावा घेतला. तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिलेत. तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.