जळगाव, मनोरंजन

पु. ना. गाडगिळ कला दालनाच्या प्रेमात जर्मनी युवती ! (व्हिडीओ)

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

दर रविवारी लाईव्ह पोर्ट्रेट पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड

  • new ad
  • Online Add I RGB
  • vignaharta
  • advt tsh 1
  • advt atharva hospital

जळगाव संजय सपकाळे । शहरातील पु.ना. गाडगीळ कलादालनात प्रत्येक रविवारी विख्यात चित्रकार हे लाईव्ह स्केच रेखाटत असतात. यात या रविवारी एका जर्मन युवतीचे पोर्ट्रेट योगेश सुतार यांनी रेखाटले.

शहरातील रिंगरोडवर असणार्‍या पु.ना. गाडगीळ या विख्यात सराफा पेढीमध्ये अतिशय भव्य असे कालदालन असून ते रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे. या कला दालनात विविध ख्यातप्राप्त चित्रकारांची कला प्रदर्शने होत असतात. याशिवाय, येथे प्रत्येक रविवारी लाईव्ह पोर्ट्रेट कार्यक्रम होतो. याच्या अंतर्गत विख्यात चित्रकार हे नागरिकांचे पोर्ट्रेट या प्रकारातील चित्र रेखाटत असतात. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कुणीही याला अगदी लाईव्ह स्वरूपात पाहू शकतो. यानुसार आज या कार्यक्रमात ख्यातप्राप्त कलावंत योगेश सुतार यांनी लाईव्ह पोर्ट्रेट साकारले. यातील लक्षणीय बाब म्हणजे ज्योस्टना कलसाईट या जर्मन तरूणीचे स्केच ठरले.

ज्योस्टना ही आपल्या पतींसोबत काही दिवसांपासून जळगावात वास्तव्यास आहे. तिला पु.ना. गाडगीळ कला दालनातील लाईव्ह पोर्ट्रेट कार्यक्रमाबाबत माहिती मिळाली होती. यानुसार तिने या दालनास भेट देऊन पोटेर्र्टची इच्छा व्यक्त केली. यानंतर योगेश सुतार यांनी अवघ्या अर्ध्या तासात कॅनव्हासवर ज्योस्टनाचे हुबेहूब चित्र साकारले. तिला हे स्केच चांगलेच भावले. तिने यासाठी योगेश सुतार आणि कला दालनाचे आभार मानत आपण परत येथे येणार असल्याची ग्वाहीदेखील दिली. आणि हा सर्व प्रकार याप्रसंगी उपस्थित असणार्‍यांनी अगदी जीवंतपणे अनुभवला. योगेश सुतार हे मूळचे धरणगाव येथील असून देश-विदेशातील अनेक कला प्रदर्शनांमध्ये त्यांच्या कलाकृती प्रदर्शीत करण्यात आल्या आहेत. त्यांच्या कॅनव्हासवरील सिध्दहस्त फटकार्‍यांमधून साकार झालेले व्यक्तीचित्र पाहण्याचा अमृतयोग पु.ना. गाडगीळ या दालनाने उपलब्ध करून दिलेला आहे. याला पाहण्यासाठी नागरिक येथे रविवारी सायंकाळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

दरम्यान, या संदर्भात पु.ना. गाडगीळ या दालनाचे व्यवस्थापक खेमचंद्र यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या पेढीच्या आजवरच्या वाटचालीत कलेस महत्वाचे स्थान असल्याचे नमूद केले. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आम्ही कलावंत आणि रसिकांसाठी भव्य दालन उपलब्ध करून दिले असून याचा लाभ घेण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.

पहा : – पु.ना. गाडगीळ कला दालनातील लाईव्ह पोर्ट्रेटबाबतचा वृत्तांत.

अधिक माहितीसाठी संपर्क :-

पु.ना. गाडगीळ अँड सन्स
बहिणाबाई उद्यानाजवळ, रिंग रोड
जळगाव
संपर्क- ०२५७-२२१४५४४

गुगल मॅपवरील अचूक लोकेशन :-