चोपडा, सामाजिक

धानोर्‍यात दोघांना पुन्हा दिसला बिबट्या !

शेअर करा !

download 8

धानोरा (प्रतिनिधी) येथील पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या हॉटेल जत्राच्या मागे पुन्हा बिबट्या दिसल्याने गावासह परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

याबाबत सविस्तर असे की, गावाबाहेर, चोपडा रस्त्यावरील हॉटेल जत्रावरील जयेश संजय बाविस्कर व शकील हसन तडवी यांना काही कुत्रे जोराने भुंकत असल्याचे जाणवले. त्यांनी हॉटेलमागे जाऊन पाहिले असता तिथे भला मोठा बिबट्या बसलेला होता. कुत्रे बिबट्याचा अंगावर धावुन गेले असता बिबट्याने जंगलाकडे धुम ठोकली. त्यांनी त्याचवेळी पोलीस पाटील दिनेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लागलीच वनविभागाला बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी केली आहे.

परीसरात बिबट्याने पेट्रोल पंप शिवार, मोहरद, बिडगाव, पुनगाव शिवारात धुमाकुळ घातला आहे. सध्या शेती मशागतीची कामे सुरु आहेत, त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.