क्राईम, जळगाव, भुसावळ

गावठी पिस्तूल व जिवंत काडतूससह एकास अटक

शेअर करा !

LCB crime news

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ शहरातील शांती नगर व जुग्गा देवी परीसरात गावठी पिस्तोल घेवून दहशत निर्माण करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील गावठी पिस्तोल व एक जिवंत काडतूज हस्तगत केले आहे.

advt tsh 1

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात जुग्गा देवी परिसरात भुसावळ तालुका क्रिडा संकुल जवळील रोडवर संशयित आरोपी विक्रांत उर्फ विक्की गणेश देवपुजे वय – २७ वर्ष, रा. वरणगाव रोड, शिवाजी नगर हा अनधिकृत एक गावठी पिस्तोल व एक जिवंत काडतूस घेवून दहशत माजवत होता. त्याची अधिक चौकशी केली असता त्यान उडवाउडवीची उत्तरे दिली. खाक्या दाखवताच त्याने त्यांच्या ताब्यातील गावठी पिस्तोल व एक जिवंत काडतूस काढून दिले. त्यांच्याविरोधात भुसावळ शहर पोलीसात भाग 6 गुरनं 190/2019 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्यासह स.फौ. अशोक महाजन, राजेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, कमलाकर बागुल, गफुर तडवी, अरुण लाडवंजारी, किरण धनगर, इंद्रीस पठाण यांनी कारवाई केली.