क्राईम, जळगाव

कुसुंबा येथे झालेल्या हाणामारीतील पाच संशयितांना अटक

शेअर करा !

jail11 2017071030

जळगाव प्रतिनिधी । ‘तु माफीचा साक्षीदार का होता?’ या कारणावरून तालुक्यातील कुसंबा गावात सोमवारी सकाळी 7 वाजता दोन गटात झालेल्या वाद हाऊन हाणामारीत रूपांतर झाले होते. या घटनेत तलवार, कोयत्यासह लाठ्या-काठयांचा वापर करून चौघे जखमी झाले होते. एमआयडीसी पोलिसात जखमी दोघांच्या जबाबावरून परस्पराविरुध्द प्राणघातक हल्ल्यासह दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

  • advt tsh flats
  • Sulax 1
  • spot sanction insta

याबाबत माहिती अशी की, पोलिसांनी सांगितले की, ‘तू माफीचा साक्षीदार का होता?’ या कारणावरून प्रविण शांताराम कोळी, रवींद्र शांताराम कोळी, विलास शांताराम कोळी, विजू उर्फ विजय नारायण कोळी, शांताराम कोळी (पूर्ण नाव माहिती नाही) सर्व रा. सर्व कुसुंबा यांनी श्रावण शेनफडू कोळी यांच्याशी वाद घातला. या वादातून पाचही जणांनी श्रावण कोळी यांच्यावर हल्ला केला. त्यात प्रविण कोळी याने श्रावण कोळी यांच्यावर तलवारीने वार करून जखमी केले. तसेच शांताराम कोळी याने लोखंडी रॉडने तर इतरांनी लाठ्या-काठ्यांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. जखमी श्रावण कोळी यांच्या जबाबावरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात तुझ्या भावाने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून बसथांब्याजवळ हॉटेलचालक रवींद्र शांताराम बाविस्कर याला श्रावण शेनफडू कोळी, हिम्मत पाटील, पंडीत कोळी, योगेश कोळी, गोलू कोळी, गणेश कोळी, भावलाल पाटील, चंद्रकांत पाटील, मयुर पाटील, चेतन पाटील, निलेश पाटील, जगन्नाथ कोळी, राजु कोळी रा. सर्व मराठी शाळेजवळ कुसुंबा यांनी लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी मारहाण करून त्याच्या हॉटेलवर दगडफेक केली. यात हॉटेलचे नुकसान झाले असून त्याच्या दुकानाच्या गल्ल्यातील ७ हजार रुपये कोणीतरी जबरीने लुटून नेले. या मारहाणीत रविंद्र बाविस्कर यांच्यासह वडील व भाऊ प्रविण हे तिघे जखमी झाले आहे. जखमी रविंद्र याच्या जबाबावरून १३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

या पाच जणांना केली अटक
श्रावण कोळी यांच्या फिर्यादीमधील राजेंद्र शांताराम कोळी, विलास शांताराम कोळी आणि विजय नारायण कोळी तर रविद्र बाविस्कर यांच्या फिर्यादीमधील राजू उर्फ राजेंद्र शेनफडू कोळी आणि रविंद्र शांताराम कोळी यांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पीएसआय संदीप पाटील, राजेंद्र कांडेकर आणि पोहेकॉ धापकर करीत आहे.