क्राईम, जळगाव

कोर्टात साक्ष देऊ नये म्हणून एकास मारहाण

शेअर करा !

Crime l 1

जळगाव प्रतिनिधी । आरोपींविरोधात कोर्टात साक्ष देऊ नये या कारणावरून एकाला 13 जणांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील म्हसावद येथे सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • Online Add I RGB
  • advt tsh 1
  • advt atharva hospital

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दशरथ गंगाराम कोळी (वय-35) रा. खडसे नगर, म्हसावद यांने आरोपींविरोधात न्यायालयात साक्ष देऊ नये यासाठी संशयित आरोपी लाला चंद्रभान सोनवणे, बापु चंद्रभान सोनवणे, संजू चंद्रभान सोनवणे, अनिल मचले (पुर्ण नाव माहिती नाही), अरूण चंद्रभान सोनवणे, रवि मचले, भुवा मचले, कैलास पिंटू सोनवणे, योगेश पिंटू सोनवणे, जितू जंगलू भिल, शोभा बापू भिल, चंद्रभान सोनवणे, भिकूबाई चंद्रभान सोनवणे सर्व रा. खडसे नगर, म्हसावद यांनी सोमवार रात्री 11 वाजता घरासमोर लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी दशरथ कोळी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.