मुक्ताईनगर, राजकीय

खडसे कुटुंबियांनी कोथळीत बजावला मतदानाचा हक्क (व्हिडिओ)

शेअर करा !

khadse family voting

मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आज तालुक्यातील कोथळी येथे मतदानाचा हक्क बजावला.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे तिकिट कापून भाजपने यावेळी त्यांची कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. शेवटच्या क्षणाला त्यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केल्याने येथील लढत चुरशीची झाली. निवडणुकीच्या कालखंडात दोन्ही बाजूंनी खूप जोर लावण्यात आला. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी कोथळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एकनाथराव खडसे, महानंदच्या अध्यक्षा सौ. मंदाताई खडसे, खासदार रक्षाताई खडसे आणि रोहिणीताई खडसे यांनी मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी प्रांजल खेवलकर यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते.