पाचोरा, राजकीय

नाथाभाऊंनी केले गिरीश महाजन यांचे समर्थन

शेअर करा !

पाचोरा प्रतिनिधी । सेल्फी प्रकरणावरून टिका झालेले जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांची माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची जोरदार पाठराखण करून प्रसारमाध्यमांना कानपिचक्या दिल्या आहेत.

  • spot sanction insta
  • Sulax 1
  • advt tsh flats

पूरग्रस्तांना मदत करत असतांना कथितरित्या असंवेदनशीलता दाखविल्याच्या कारणावरून ना. गिरीश महाजन यांच्यावर मेनस्ट्रीम आणि सोशल मीडियातून जोरदार टीका करण्यात आली. या पार्श्‍वभूमिवर, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी महाजन यांचे समर्थन केले आहे. पाचोरा येथील एका कार्यक्रमात ते म्हणाले की, राजकीय क्षेत्रातील कुठल्याही व्यक्तीने कितीही चांगले काम केले असेल तरी प्रसारमाध्यमे त्यांना जितकी प्रसिद्धी देत नाहीत त्यापेक्षा अधिक प्रसिद्धी ही त्या व्यक्तीकडून झालेल्या एका चुकीला देतात. अशाच प्रकारे एका सेल्फीचे फळ सध्या गिरीश महाजन हे अनुभवत आहेत. ते पुढे म्हणाले की, गिरीश महाजन यांनी पाण्यात बुडणार्‍यांचे अनेकांचे जीव वाचवले, ते सतत तीन दिवस पाण्यात होते, त्यास प्रसिद्धी न देता त्यांच्या एका सेल्फीवर टीका करण्यात आली. चांगल्या गोष्टींचेही कौतुक झाले पाहिजे. व्यापक प्रसिध्दी मिळावी. आपल्यालाही आयुष्यात मीडियाकडून असेच अनुभव आल्याकडे खडसे यांनी लक्ष वेधले.

या कार्यक्रमाला आमदार किशोर पाटील, बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे, डॉ. भूषण मगर, सचिन सोमवंशी, पं.स. सभापती बन्सी पाटील, अशोक लाडवंजारी, अनिल महाजन आदींची उपस्थिती होती.