एरंडोल, सामाजिक

कासोदा येथे महेश नवमी उत्साहात साजरी (व्हिडीओ)

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

miravnuk 1

कासोदा प्रतिनिधी । येथील माहेश्वरी समाजातर्फे श्री. महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली.

  • advt tsh 1
  • advt atharva hospital
  • vignaharta
  • new ad
  • Online Add I RGB

याबाबत माहिती अशी की, सकाळी कासोदा बसस्टॉप बिर्ला चौक येथे सरबताचे स्टाँल लावून सरबत वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. तसेच श्री च्या प्रतिमेची पूजा करून संध्याकाळी ढोल ताश्याच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. यावेळी तरुणाईने फेटे बांधून उसत्व आनंदाने साजरा केला. तसेच माहेश्वरी समाज बांधवांच्या उपस्थितीत मिरवणुकीची सुरुवात श्री बालाजी मंदिर येथून सुरू करून बस स्टॉप मार्गे बिर्ला चौक, मेनरोड, भोई गल्ली, कैलास मेडीकल, जुने पोलीस स्टेशन मार्गे येऊन पुन्हा सांगता, बालाजी मंदिरा जवळ करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष शैलेश मंत्री, उपाध्यक्ष कैलास सोमाणी, उपाध्यक्ष सुनील झंवर, रुपेश बाहेती, स्वप्निल बियाणी, अमोल मंत्री, जयप्रकाश समदानी, उमेश नवाल, सनी नवाल, पुनम बाहेती, पुणेश मंत्री, गोपाल पांडे, प्रविण झंवर, गोविंद लढे, तुषार मंत्री, राजेंद्र सोमाणी, निलेश सोमाणी, आकाश नवाल, प्रदिप झंवर व मयूर पांडे आदी मंडळी उपस्थित होते.