क्रीडा, चाळीसगाव

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत कौशिक बागडचे यश

शेअर करा !

chalisgaon kaushik

चाळीसगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे शहरातील बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी १५, १७ आणि १९ वर्षाआतील मुलामुलींच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात १७ वर्षाआतील खेळविण्यात आलेल्या सामन्यात कौशिक बागड आणि कृष्णा अग्रवाल यांच्यात रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात कौशिक याने कृष्णा अग्रवाल यांच्यावर मात करीत विजय संपादन केला तर १९ वर्षाआतील गटात झालेल्या सामन्यात अर्थव चौधरी यावर मात करीत कौशिक बागड याने विजय मिळवला.

advt tsh 1

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
कौशिक बागड याची नागपूर व ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षक अमोल पाटील, मयुर भावसार यांचे मार्गदर्शन लाभले तर खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, पं.स.उपसभापती संजय पाटील, बेटी बचाओ अभियानाच्या प्रदेश संयोजिका प्रा.डॉ.अस्मिता पाटील, चाळीसगाव एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, कळंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ.सुनील राजपूत आदींनी अभिनंदन केले आहे.

कौशिकचा केला सत्कार
शहरातील युनिटी क्लबच्या वतीने विजयी कौशिक बागड याचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी क्रिडा शिक्षक प्रवीण राजपूत, सतिश जैन, प्रवीण बागड, मनिष मेहता, भुपेश शर्मा, हेमंत वाणी, गितेश कोटस्थाने, निशांत पाठक, स्वप्नील धामणे, विशाल गोरे, राकेश राखुंडे, मनिष ब्राह्मणकर, पियुष सोनगीरे, स्वप्निल कोतकर आदी उपस्थित होते.