क्राईम, जळगाव

जिल्ह्यातील कलेक्शन करणारे ‘ते’ पोलीस कर्मचारी मुख्यालयात जमा !

शेअर करा !

panjabrao ugale

जळगाव प्रतिनिधी । हप्ते वसुली करण्याचा संशय असलेल्या जिल्ह्यातील ७२ पोलीस कर्मचार्‍यांना मुख्यालयात जमा केल्याने खळबळ उडाली आहे. आज सायंकाळी या कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षकांनी काढले आहेत.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

हे कर्मचारी कलेक्शनचे काम करत असल्याची पोलीस दलात चर्चा आहे. यामुळे वादग्रस्त पार्श्‍वभूमि असणार्‍या कर्मचार्‍यांना मुख्यालयात जमा करून पोलीस अधिक्षकांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. दरम्यान, बदली स्विकारून तात्काळ रूजू न होता वैद्यकिय कारणे देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या आत्ताच्या नियुक्तीच्या ठिकाणाहून वरिष्ठांनी तात्काळ कार्यमुक्त करावे, असेही या संबंधीच्या आदेशात म्हटले आहे.