यावल, सामाजिक

जेष्ठ नागरीक ओळखपत्र ऐवजी स्मार्ट कार्डचा वापर

शेअर करा !

 

basssssss

यावल प्रतिनिधी । वयोवृध्द नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलत मिळवण्यासाठी त्यांना जेष्ठ नागरिक ओळखपत्र दिले जाते. मात्र याचा लाभ कमी वय असलेले प्रवासीही घेत असल्याच परिवहन महामंडळाच्या निदर्शानास आले आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत माहिती अशी की, तालुक्यात, जिह्यात व राज्यात अनेक नागरीकांनी आपले जेष्ठ नागरीक ओळखपत्र बनवले आहे. यामुळे अनेक तक्रारी वाढल्याचे परिवहन महामंडळाच्या निदर्शनास ही बाब आल्याने, या प्रकारामुळे एसटी महामंडळाला लाखो रुपयांचे भृदंड बसत असल्याने, महामंडळाने खऱ्या जेष्ठ नागरीकांनाच याचा लाभ मिळावा यासाठी ही स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. या जेष्ठ नागरीक स्मार्ट कार्ड ओळखपत्राद्वारे जेष्ठ नागरीकांना चार हजार किलोमीटर लांबीचा प्रवास करता येणार आहे. चार हजार किलोमिटर पर्यंतचा प्रवास झाल्यावर या स्मार्ट कार्ड ओळखपत्राचे नुतनीकरण करावे लागणार आहे. या स्मार्ट कार्ड ओळखपत्राला आधार कार्डाशी जोडले जाणार असल्याने बोगस जेष्ठ नागरीक ओळखपत्राद्वारे प्रवास करणाऱ्यांचा पुढचा प्रवास थांबणार आहे. या जेष्ठ स्मार्ट कार्ड ओळखपत्राकरीता ५० रूपये शुल्क खर्च लागणार असुन, यासाठी जेष्ठ नागरीकांना कुठल्याही दलालाची मध्यस्थी न करता स्वता:च हजर राहुन आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक अनिवार्य राहणार असुन, सदरच्या ओळखपत्रा करीता तालुका आगाराच्या ठीकाणी जावे लागणार आहे. ओळखपत्र हे तात्काळ जेष्ठ नागरीकांना उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न एसटी परिवहन महामंडळाकडुन करण्यात येणार आहे. जेष्ठ नागरीक ओळखपत्र आगारातील संबधीत विभागाकडे प्राप्त झाल्यावर, तशी सूचना मोबाईलव्दारे देण्यात येणार आहे.