क्राईम, जामनेर

जामनेर येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी जागीच ठार

शेअर करा !

Jmaner newss

जामनेर, प्रतिनिधी । नातेवाईकांकडून जेवन आटोपून घरी जाणाऱ्या दाम्पत्याला समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत पदचारीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार जखमी झाला. याबाबत जामनेर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

advt tsh 1

याबाबत माहिती अशी की, शहरातील मधूबन कॉलनीत राहिवाशी अनिल समाधान माळी (वय-45) हे आपल्या पत्नीसह हिवरखेड रोडवरील नातेवाईकांडे जेवणसाठी गेले होते. जेवण आटोपून रात्री 10.30 वाजता घरी परतत असताना जळगाव रोडवरील शासकीय विश्राम गृहाजवळ सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे ड्युटीवर जाणाऱ्या दुचाकीस्वार ईश्वर सुरळकर याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने थेट अनिल माळी यांना जोरदार धडक दिली. या धडकेत अनिल यांचा जागीच मृत्यू झाला. माळी यांना उपजिल्हा रूग्णालयात नेले असता. वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. दरम्यान ही घडताना मयत माळी यांच्या पत्नी सोबत असल्याने त्यांना खुप मोठा मानसिक धक्का बसल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांच्या वर उपचार सुरू आहेत. मयत अनिल माळी यांचा लक्झरी बस स्टॉप चौकडा हनुमान मंदिराजवळ त्यांचा पान टपरी चा व्यवसाय करतात. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. मयत अनील माळी स्वभाव हा अत्यंत मनमिळावू असल्याने त्यांच्या अशा धक्कादायक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.