कोर्ट, क्राईम, जळगाव

जळगावात तरूणाला मारहाण करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

शेअर करा !

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

जळगाव प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग येवून एकाला तिघांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणातील तिघांना सोमवारी रात्री उशीरा अटक करण्यात आले होते. तिघांना आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

advt tsh 1

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनिस खान नईम खान (वय-32) रा. टेकावडे गल्ली, शाहु नगर हा रविवार 8 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता कटींग करण्यासाठी जात असतांना रस्त्यात संशयित आरोपी अजरूद्दीन अजीज भिस्ती (वय-32), नसरूद्दीन अजिज भिस्ती (वय-30) आणि मुस्तकीन मुन्ना भिस्ती (वय-37) तिन्ही रा. शाहू नगर जळगाव हे तिघे भेटले. यातील संशयित अजरूद्दीन याने अनिस याच्याकडून दारू पिण्यासाठी शंभर रूपये मागितले असता त्याला नकार दिल्याने राग येवून संशयित अजरूद्दीन याने हातातील काचेची बाटली डोक्यावर मारली व खिश्यातील 700 रूपये बळजबरीने काढून घेतले. ही घटना घडल्यानंतर घराकडे जात असतांना सोबत असलेले नसरूद्दीन भिस्ती व मुस्तकीन भिस्ती यांनी पकडून अनिस याला शिवीगाळ करून पुन्हा चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीसात अनिस यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजरूद्दीन अजीज भिस्ती, नसरूद्दीन अजिज भिस्ती आणि मुस्तकीन मुन्ना भिस्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या तीन तासात शहर पोलीसांनी तिन्ही संशयितांना अटक केली. आज तिघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.