राष्ट्रीय

भारताचे ‘चांद्रयान-२’ उद्या रवाना होणार

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

chandrayan 300x200

श्रीहरीकोटा (वृत्तसेवा):  भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या ‘चांद्रयान-२’  च्या प्रक्षेपणाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. उद्या १५ जुलै रोजी रात्री २ वाजून ५१ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ चं आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरीकोटामधून येथून प्रक्षेपण होणार आहे.

  • new ad
  • advt atharva hospital
  • Online Add I RGB
  • vignaharta
  • advt tsh 1

‘चांद्रयान-२’ चं लॉन्चिंग नंतर ५२ दिवसाने चंद्रावर पोहोचेल. इस्रोच्या या महत्त्वकांशी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश भारत ठरणार आहे चंद्रावरच्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली आहे. चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे. इस्त्रोमार्फत करण्यात येणाऱ्या या लॉचिंगचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे लॉचिंग सर्वसामन्यांना श्रीहरीकोटा येथून प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) मागच्यावर्षी दोन वेळा अपयश आल्यानंतर ही मोहिम पार पडत आहे.