क्राईम, राज्य, राष्ट्रीय

भारतीय सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यास जिवंत पकडले

शेअर करा !

Jaish e Mohammed terrorist

नवी दिल्ली प्रतिनिधी । काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने घुसलेल्या एका दहशतवाद्याला बारामुल्ला येथील भारतीय सुरक्षा दलाने जिवंत पकडले असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी मोहसिन मंजूर सालेहा हा जुने शहर बारामुल्लाचा राहणारा आहे. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जम्मू आणि काश्मीर पलिसांनी दहशतवागी मोहसिन मंजूर सालेहा हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. मोहिसनवर प्रामुख्याने बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवादी कारवाया करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. एखाद्या दहशतवाद्याला जिवंत पकडणे ही सुरक्षा दलासाठी खूपच मोठी कामगिरी असल्याचे संरक्षण विशेषज्ञ कमर आगा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे. या जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याची चौकशी करताना आपल्याला दहशतवाद्यांच्या जाळ्याबाबत, तसेच भविष्यातील योजनांबाबत माहिती मिळू शकणार आहे. भविष्यातील या कटांमध्ये कोण-कोण सहभागी आहे. हे देखील या चौकशीतून पुढे येईल. त्याच प्रमाणे या दहशतवादी कारवाया नेमक्या कुठून नियंत्रित करण्यात येत आहेत. याबाबतही या चौकशीत कळू शकणार असल्याची माहिती आगा यांनी दिली.