क्रीडा

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची सरशी

शेअर करा !

पोर्ट ऑफ स्पेन वृत्तसंस्था । येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने विंडीजवर ५९ धावांनी मात केली.

  • advt atharva hospital
  • advt tsh 1
  • Online Add I RGB

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात २७९ धावांपर्यंत मजल मारली. मात्र विंडीजच्या फलंदाजीदरम्यान सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे, यजमान संघाला विजयासाठी ४६ षटकात २७० धावांचं लक्ष्य देण्यात आलं. विंडीजचा संघ २१० धावांपर्यंत मजल मारु शकला. एविन लुईसचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. भारतातर्फे भुवनेशकुमारने अतिशय उत्तम गोलंदाजी केली. त्याने रोस्टन चेस, केमार रोच, कार्लोस ब्रेथवेट यांना बाद केले. भुवनेश्‍वरने चार; कुलदीप यादव- मोहम्मद शामीने प्रत्येकी दोन तर तर खलिल अहमद, आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी एक बळी घेतले.

तत्पूर्वी कर्णधार विराट कोहलीचं शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दुसर्‍या वन-डे सामन्यात २७९ धावांपर्यंत मजल मारली. विराटने आपलं वन-डे कारकिर्दीतलं ४२ वं शतक पूर्ण केलं, तर वन-डे संघात संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरनेही शतक झळकावले.