राजकीय, राज्य

राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

मुंबई (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीचा निकाल आपल्या अनुकूल लागण्याची शक्यता भाजपने गृहीत धरली आहे. त्यामुळे निकालाआधीच राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत मिळत असून निवडणुकांच्या तोंडावर पक्षात आलेल्या काही ‘आयाराम’ नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याचे वृत्त आहे. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Akshay Trutiya

 

 

लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. वारे वाहू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्यास राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.