जळगाव, राजकीय

पुन्हा संधी दिल्यास उर्वरित विकास कामे मार्गी लावणार ; ना. गुलाबराव पाटील

शेअर करा !

img 20191016 wa0011 26733637874537141632

नशिराबाद, प्रातिनिधी | महायुतीचे उमेदवार ना. गुलाबराव पाटील यांनी आज नशिराबाद येथे जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपा बंडखोरांचा चांगलाच समाचार घेत आपणच निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला.  पुन्हा संधी दिल्यास उर्वरित विकास कामे मार्गी लावणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

मी पाच वर्ष मंत्री राहिलो, पाच वर्ष लोकांच्या संपर्कात असून मजबूत कार्यकर्त्यांची फळी आहे. तरी सुद्धा मला भीती वाटते आहे आणि माझे प्रतिस्पर्धी उमेदवारांना वाटते की, ते एकाच फेरीत आमदार होतील याचे मला आश्चर्य वाटते असे ना. गुलाबराव पाटील यांनी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचे नाव न घेता टीका केली.  त्यांनी पाच वर्ष एक एक माणूस जोडला असल्याने त्यांना पराभूत करणे अवघड असल्याचे श्री.  पाटील यांनी सांगतिले. निवडणुकीत जातीचे राजकारण केले जात आहे. परंतु, माझी जात ही तुम्ही सर्व असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला निवडून द्या. तुम्ही आशीर्वाद दिला तर निवडून येईल नाहीतर घरी जाईल असे भावनिक आवाहन त्यांनी केले. ३५ वर्ष एकाच पक्षावर निष्ठा ठेवल्याने आपणास मंत्रिपद मिळाले असे त्यांनी सांगितले. स्वतः जिल्हा परिषद सदस्य नसतांना झेरॉक्स असतांना सीईओ यांच्या अंगावर फाईल फेकली. मात्र शिवसेना-भाजपच्या मंत्र्यांनी समजाविल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगितले. चंद्रशेखर अत्तरदे यांचे नाव न घेता तुम्हाला नाथाभाऊ यांनी मोठे केले व हे त्यांनाच त्रास देत असल्याचा टोला लगवला. धरणगाव शहरात फिल्टर प्लांट दिला, चागले रस्ते दिले, गावात सुंदर स्मशानभूमी बनविली. प्रत्येक गावात कामे केली असल्याने त्या कामांच्या जोरावर मत मागत आहे. नशिराबाद येथे नगरपालिका केल्या शिवाय राहणार नाही. धरणगाव प्रमाणेच नशिराबाद येथे पक्ष विरहीत विकास कामे करणार आहे. त्यांच्या मतदारसंघातत्यांना सर्व धर्मीय लोकांचा पाठींबा आहे. ज्या प्रमाणे खासदार उन्मेष पाटील यांना लीड दिल त्याच प्रमाणे त्यांना लीड  मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी बोलून दाखविला.