क्राईम, राष्ट्रीय

हैदराबाद बलात्कार : हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह तिघे निलंबित

शेअर करा !

rape and muder mumbai

हैदराबाद (वृत्तसंस्था) डॉक्टर महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिची जाळून हत्या केल्याच्या घटनेच्या प्रकरणात हलगर्जी केल्यामुळे एका पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सायबराबाद पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता.

  • advt tsh flats
  • Sulax 1
  • spot sanction insta

 

सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी ही कारवाई केली आहे. ‘२७ आणि २८ नोव्हेंबर दरम्यानच्या रात्री एक महिला बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात शमशाबाद पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात विलंब झाल्याचा आरोप झाला होता. त्याची सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर या प्रकरनाणात हलगर्जी झाल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले. त्याआधारे उपनिरीक्षक एम. रवी कुमार, हेड कॉन्स्टेबल पी. वेणुगोपाल रेड्डी आणि ए. सत्यनारायण गौड यांना पुढील आदेश मिळेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ पावले उचलली असती तर कदाचित पीडितेचा जीव वाचवता आला असता, असा कुटुंबीयांचा आरोप आहे.