क्राईम, राज्य

पत्नीच्या त्रासास कंटाळून पतीची आत्महत्या

शेअर करा !

suside

पुणे (वृत्तसंस्था) पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एनडीए रोड परिसरात घडली आहे.

advt tsh 1

या संदर्भात अधिक असे की, अरुण सुरेश वाबळे (वय ३४, रा. कोंढवे-धावडे, एनडीए रोड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण व अर्चना यांचा प्रेमविवाह झाला होता. अरुण पेटिंगचे काम करत होता; तर अर्चना ही खासगी शिकवणी घेत होती. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद होत होते. यातून अर्चना, तिचा भाऊ व बहिण हे अरुण यांना मानसिक व शारीरिक त्रास देत होते. तसेच, त्यांनी अरुण यांना शिवीगाळ करून मारहाणही केली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी अरुण यांची आई जिजाबाई वाबळे (वय ५२) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नी अर्चना वाबळे उर्फ डावरे हिच्यासह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.