ADVERTORIAL, जळगाव, ट्रेंडींग

‘अन्न हे पूर्णब्रह्म’ची अनुभुती देणारे हॉटेल सत्यब्रह्म ! ( व्हिडीओ )

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । अतिशय स्वादिष्ट अशा खान्देशी खाद्य पदार्थांसाठी ख्यात असणार्‍या हॉटेल सत्यब्रह्मला खरं तर कोणत्याही परिचयाची गरज नाही. यातच, आता विस्ताराच्या माध्यमातून सत्यब्रह्म हे टेकऑफ घेण्याच्या तयारीत आहे. याचेच औचित्य साधून घेतलेला हा आढावा.

  • Online Add I RGB
  • advt atharva hospital
  • advt tsh 1

हॉटेल सत्यब्रह्मचे संचालक किरण महाजन यांच्याशी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने संवाद साधला असतांना त्यांनी आपल्या आजवरच्या वाटचालीचा आलेख उलगडून दाखविला. खरं तर किरण महाजन यांच्या कुटुंबात कुणालाही व्यवसायाचा वारसा नव्हता. मात्र आयुष्यातील एका क्षणाला नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतांना त्यांनी हॉटेलचा पर्याय निवडला. आणि यानंतर काय झाले ते सर्व जळगावकरांसमोर आहेच. पारंपरिक भरीतासाठी प्रसिद्ध असलेल्या सत्यब्रम्ह हॉटेलातील अन्य पदार्थही शहरातील खवैय्यांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय ठरले आहेत. येथली शेव भाजी, पातोडी भाजी, फणस भाजी, मश्रूम भाजी असे पदार्थ लोकांच्या आवडीचे ठरले आहेत. त्याचवेळी लोकांची गरज लक्षात घेऊन हॉटेल मालक महाजन यांनी खास खानदेशी थाळी सादर केली असून या थाळीत भरीत, शेव भाजी, दाल तडका, चपाती आणि भात या पाच पदार्थांचा समावेश असलेली ही थाळीही चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. माफक दरात एकाचवेळी हॉटेलची स्पेशालिटी असलेले तीन पदार्थ या थाळीमुळे खवैय्यांना चाखता येत आहेत. सत्यब्रह्मच्या विविध डिशेशमधून अन्न हे पूर्णब्रह्म असल्याची प्रचिती येत असल्याचे असंख्य खवैय्यांचे मत आहे. विशेष बाब म्हणजे जळगाव वा जळगाव जिल्हाच नव्हे तर दूरवर अगदी अमेरिकेपर्यंत सत्यब्रह्मच्या चवीची ख्याती पसरली आहे हे विशेष.

अशाप्रकारे पारंपरिक खानदेशी जेवणाच्या क्षेत्रात जोरदार यशस्वी वाटचाल करूनही किरण महाजन यांचे व्यक्तिमत्व अत्यंत निगर्वी असे आहे. या व्यवसायात आपली कुठल्याही सम व्यावसायिकाशी स्पर्धा नसल्याचे ते अतिशय नम्रपणे सांगतात. दरम्यान, सत्यब्रह्मचा वाढता विस्तार लक्षात घेऊन आता ५ मार्चपासून शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळ त्याची एक शाखा सुरु होत आहे. या माध्यमातून आता सत्यब्रह्म हे खर्‍या अर्थाने प्रगतीची उड्डाण घेण्यासाठी सज्ज झाले आहे. आजवर आपण जवळपास दशकभरातून ग्राहकांना अतिशय आपुलकीची सेवा दिली असून नव्या हॉटेलमध्येही याच प्रकारची सेवा देण्यास तत्पर राहणार असल्याची ग्वाही किरण महाजन यांनी आवर्जुन दिली.

पहा :- हॉटेल सत्यब्रह्मबाबतचा हा व्हिडीओ वृत्तांत.

गुगल मॅप्सवरील सत्यब्रह्मचे अचूक लोकेशन.