क्राईम, यावल

हिंगोणा येथे ट्रॅक्टर उलटल्याने मजूर जखमी

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

hingona accident

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ गाळ वाहकतुक करणारे ट्रॅक्टर उलटून एक मजुर जखमी झाला असुन, त्यास उपचारासाठी यावल येथे आणले असता त्यास प्राथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

  • NO GST advt 1
  • linen B

 

याबाबत माहिती अशी की, सध्या यावल तालुक्यातील हिंगोणा या शिवारात असलेल्या मोर धरणातुन गाळ उपसाचे काम सुरू आहे. आज सोमवार 15 एप्रिल रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान मोर धरणातुन गाळ उपसा करून गाळ वाहतुक करणारे ट्रॅक्टर हिंगोणा परिसरातील मोर धरणाच्या मार्गावर अचानक उलटले. या अपघातात गाळ वाहकतुक करणारा मजुर कुर्बान मरेखाँ तडवी (वय-२५) वर्ष राहणार कुंडया पाणी तालुका यावल हा जखमी झाला. जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करून निघुन गेल्याची माहिती आरोग्य कर्मचाराऱ्यांनी दिली. सदरचे ट्रॅक्टर धरणाचे गाळ हे उपसा करून चोपडा तालुक्यातील बीडगाव येथे वाहकतुक करीत होते. जखमी अवस्थेत आणि ट्रक्टर उलटल्याने ट्रक्टर चालक यांने घटनास्थळाहून पळ काढला होता अशी माहिती जखमी कुर्बान यांनी दिली. प्राथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.