Agri Trends, भुसावळ

जिल्ह्यात संततधार पावसामुळे कापूस अन तीळ पिकांना फटका (व्हिडीओ)

शेअर करा !

kapus and til

भुसावळ, प्रतिनिधी | श्रावण महिन्यात आरंभापासूनच जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती, त्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्याने कापूस व तीळ यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • advt tsh flats
  • Sulax 1

 

मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. या पावसाचा फायदा इतर पिकांना झाला असला तरी कापूस व तीळ या पिकांचे मात्र नुकसान झाले आहे. कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने या पिकाची पाने करपली आहेत. त्यामुळे उत्पन्नाची टक्केवारी घटली आहे, तसेच तीळ हे पीक पूर्णपणे नष्ट झाले असून शेतात साचलेल्या पाण्यामुळे तीळीचे मोठे नुकसान झाले आहे.