राजकीय, राज्य

हर्षवर्धन पाटील यांचा उद्या भाजपात प्रवेश

शेअर करा !
mum09
 

इंदापूर (वृत्तसंस्था) काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित असणार आहेत.

advt tsh 1

 

इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील हे नाराज होते. मागील विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भारणे यांनी पराभव केला होता. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह पाटील यांचा होता. आघाडीच्या जागा वाटपातही या जागेवर चर्चा सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वी इंदापूर येथे झालेल्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली होती. लोकसभेला आम्हाला मदत करा विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा सोडतो,असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला विश्वासघात गेला, असे म्हणत यांनी हल्लाबोल केला होता.