क्राईम, जळगाव

झाडाला गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट
death penalty hanging
death penalty hanging

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथील 40 वर्षीय व्यक्तीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्याच्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत तालुका पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Akshay Trutiya

मिळालेल्या माहितीनुसार, गोकूळ सोमा सपकाळे (वय-40) रा. कानळदा ता.जि.जळगाव हे शेतीचे काम करून आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करतात. घरात चांगले वातावरण असतांना त्यांनी आज सकाळी घराच्या मागच्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे 15 रोजी सकाळी 9.30 ते 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.