अमळनेर, क्राईम

अमळनेरात एक लाखाचा गुटखा जप्त

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

अमळनेर प्रतिनिधी । येथील पोलिसांच्या पथकाने एक लाखाचा गुटखा तसेच याला घेऊन जाणारी स्वीफ्ट डिझायर कारसह चालकाला अटक केली आहे.

  • advt atharva hospital
  • Online Add I RGB
  • advt tsh 1
  • vignaharta
  • new ad

याबाबत वृत्त असे की, सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने सगळ्या बाजुंनी पोलीस तपासणी कक्ष सुरू असल्याने निवडणूक काळात पैसा,काही गोष्टीवर निवडणूक विभागाच्या आदेशानुसार रडारवर आहेत. त्यामुळे प्रत्येक वाहनांची चौकशी करतांना पोलीस कर्मचारी दिसत आहे. या अनुषंगाने आज अमळनेर शहरात सिंधी कॉलनी व ताडेपुरादरम्यान ओम टी चे मालक विक्की सुंदरदास बठेजा रा.सिंधी
कॉलनी यांच्या स्वमालकीच्या स्वीप्ट डिझायर क्रमांक एमएच-०३/५२६५ या क्रमांकाच्या गाडीत एक लाख चार हजार पाचशे रु किमतीचा गुटखा आढळून आला. त्यात मुद्देमाल गाडी३ लाख किमतीची असून असा एकूण ४ लाख किमतीचा ऐवज अमळनेर पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.