कोर्ट, चोपडा, जळगाव, धरणगाव, राजकीय

गुलाबराव देवकर, आमदार सोनवणे यांची कारागृहातून सुटका

शेअर करा !

207837f5 2003 4342 b6dc c84f4255c1bf

नाशिक (प्रतिनिधी) घरकुल प्रकरणात शिक्षा सुनावल्यापासून अटकेत असलेले जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व आमदार चंद्रकांत सोनवणे यांची आज कारागृहातून सुटका झाली आहे. देवकर यांचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने चार दिवसापूर्वी मंजूर केला होता.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

या संदर्भात अधिक असे की, जळगाव नगर पालिकेच्या राज्यभरात गाजलेल्या घरकुल घोटाळ्यातील शिक्षा झालेल्या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी जामीनासाठी औरंगाबाद कोर्टात धाव घेतली होती. ४ ऑक्टोंबर रोजी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला होता. त्यात माजीमंत्री  गुलाबराव देवकर तसेच आ.चंद्रकांत सोनवणे यांच्यासह शिक्षा झालेल्या सुमारे ३६ नगरसेवकांचा समावेश होता.