जळगाव, राजकीय

पवारसाहेबांचा फोन अन् देवकर लागले लोकसभेच्या कामाला ! (व्हिडीओ)

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

जळगाव विजय पाटील । राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा कॉल आल्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघासाठीची उमेदवारी निश्‍चित झाली असून ते कामाला लागले आहेत. तर राष्ट्रवादीच्या पहिल्याच यादीत देवकरांचे नाव असेल हेदेखील स्पष्ट झाले आहे.

  • ssbt
  • election advt

गुलाबराव देवकर हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार असतील हे वृत्त लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने सर्वप्रथम प्रकाशित केले आहे. यावर आता शिक्कामोर्तब होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवकर यांना फोन केला होता. फोनवरील चर्चेनंतर आज सकाळपासूनच देवकर यांनी बैठकांवर बैठकांवर घेतल्या.त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देखील दिले आहेत. देवकर मंगळवारपासून विधानसभा निहाय दौरे देखील सुरु करणार आहेत. एकंदरीत जळगाव लोकसभेसाठी देवकर यांची उमेदवारी निश्‍चित झाल्याचे स्पष्ट आहे. या संदर्भात देवकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्मित हास्य करून विषय टाळून नेला.

काही दिवसांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादीने लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत जळगाव लोकसभा मतदार संघासाठी पुन्हा एकदा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना विचारणा झाली असता, त्यांनी नकार दिला होता. परंतु भाजपला तोड देण्यासाठी राष्ट्रवादीकडे आजच्या घडीला देवकर यांच्या सारखा तगडा उमेदवार नाहीय,हे पक्षाश्रेष्ठी जाणून आहे. शिवसेनेकडून होणारी छुपी मदत आणि इतर गणित लक्षात घेता गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादीसाठी विजयी उमेदवार आणि अर्थातच लोकसभेत लंबी रेस का घोडा ठरू शकतात. पवार साहेबांचा फोन आल्यानंतर गुलाबराव देवकर यांनी जळगाव ग्रामीणमधील आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. त्यांच्यासोबत बराचवेळ चर्चा करत कामाला लागण्याचे आदेश दिलेत. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार असून यात देवकर यांचे नाव असल्याचे समजते.

पहा– गुलाबराव देवकर यांच्या उमेदवारीबाबतचा वृत्तांत.

One Comment

  1. सुरेश सुर्यवंशी

    कृपया, मला अपडेट बातम्या पाठवत रहा

Leave a Comment

Your email address will not be published.