जळगाव, ट्रेंडींग, राजकीय, रावेर

डॉ. उल्हास पाटलांचा उमदेपणा; रक्षाताईंना दिल्या विजयाच्या शुभेच्छा !

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । राजकारणातील कटुतेचे अनेक भयंकर अध्याय आपल्यासमोर असतांना डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्याला हरवून खासदार बनलेल्या रक्षाताई खडसे यांना शुभेच्छा देऊन एक आदर्श समोर ठेवला आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षाताई खडसे यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा पराभव केला. खरं तर निवडणुकीच्या प्रचारासाठी डॉ. पाटील यांना वेळ कमी पडला. त्यांचे नाव खूप उशीरा जाहीर झाले. यामुळे ते या लढतीत पुर्णपणे उतरल्याचे दिसून आले आहे. परिणामी त्यांना या संग्रामात पराभव पत्करावा लागला. तथापि, आपला पराभव झाला असतांनाही डॉ. उल्हास पाटील यांनी आज समाजमाध्यमातून रक्षाताई खडसे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून खासदार रक्षाताई खडसे यांचे अभिनंदन करणारे ग्राफीक्स शेअर केले आहे. राजकीय वैमनस्यातून आलेली खुन्नस ही अगदी एकमेकांना आयुष्यात उठविण्यापर्यंत गेल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. अगदी आपल्या जिल्ह्यातील काही राजकीय विरोधक एकमेकांना संपविण्यासाठी कोणत्याही स्थरावर जाण्यासाठी तयार असल्याचे आधीच दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमिवर, डॉ. उल्हास पाटील यांनी दाखविलेला मनाचा मोठेपणा हा राजकीय क्षेत्रातील एक आदर्श बनणार हे निश्‍चित.

डॉ. उल्हास पाटील यांनी आधीही सामाजिक व्यासपीठावरून अनेकदा खासदार रक्षाताई खडसे यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. निवडणुकीच्या काळातही दोन्ही बाजूंनी शालीनपणा सोडला नाही. तर पराभव होऊनही उल्हासदादांनी दाखविलेला मोठेपणा खूपच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या उमदेपणाला लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचा मानाचा मुजरा !