अर्थ, राज्य, राष्ट्रीय

सरकारला मोठं यश ; मिळेल स्विस बँकेकडून खात्यांची माहिती

शेअर करा !

Swiss bank

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । परदेशी भूमीतून काळ्या पैशाची माहिती मिळण्याच्या बाबतीत सरकारला मोठे यश मिळाले आहे. खातेदारांची माहिती गोपनीय ठेवण्याबाबत ज्या देशाचे नाव आघाडीवर होते, अशा स्वित्झर्लंड सरकारने बँक खात्यांशी संबंधित माहिती भारत सरकारसमोर सादर केली आहे. स्वित्झर्लंडच्या कर विभागाच्या माहितीनुसार, पुढील माहिती भारत सरकारला सप्टेंबर २०२०मध्ये मिळणार आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

म्हणजेच पैसे लपवण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या स्विस बँकेत उघडलेल्या भारतीय खात्यांची माहिती सरकारकडे सोपवली आहे. ही माहिती मिळणार्‍या काही महत्वाच्या देशांपैकी भारत एक देश ठरला आहे. स्वित्झर्लंडमध्ये जगातील 75 देशांपैकी, जवळपास 31 लाख खाती असून जी रडारवर आहेत. त्यामध्ये भारताच्या अनेक खात्यांचा समावेश आहे. स्वित्झर्लंड सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर, भारतीय सरकारने छाननी केल्यावर ही सर्व खाती बेकायदेशीर नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सरकारी एजन्सी आता या प्रकरणाची चौकशी सुरू करतील, ज्यामध्ये खातेदारांची नावे, त्यांची खाते माहिती सामायिक केली जाईल आणि कायद्यानुसार कारवाई केली जाईल. मात्र भारतीयांशी संबंधित नेमकी किती खाती यामध्ये आहेत, तसेच यामध्ये किती रक्कम आहे, ही माहिती वृत्तसंस्थेला देण्यास एफटीएने गोपनीयतेच्या नियमांतर्गत नकार दिला. परदेशात ठेवलेल्या काळ्यापैशाविरोधात सरकारने सुरू केलेल्या मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.