उद्योग, भुसावळ, सामाजिक

भुसावळात ‘धान्य व्यापारी सभा’ संपन्न

शेअर करा !

dhanya sabha

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील संतोषीमाता सभागृहात आज जळगाव जिल्हा धान्य व्यापारी सभा संपन्न झाली. या सभेस 17 तालुक्यातील 350 व्यापारी हजर होते.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रत्येक मार्केट कमिटी मधील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रोजच्या व्यापारात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा सभेची नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून नवीन अध्यक्ष राधेश्याम लाहोटी आणि भरत शेंडे यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला आहे. तसेच येथील आडत व व्यापारी असोसिएशनने उत्कृष्टरित्या सभेचे आयोजन केल्याने जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी कौतुक केले. भरत शेंडे, अल्केश ललवाणी, अशोक राठी, राधेश्याम लाहोटी, राधेश्याम काबरा, हेमंत वाणी, वृषभ पारख आदीं व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केल आहे.