अमळनेर

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात गतीमंद विद्यार्थ्यांना फळवाटप

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

28d67606 515e 409a bb1c a2489c69573c

अमळनेर (प्रतिनिधी) आज (दि.१३) शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मतिमंद शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांकडून केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

  • vignaharta
  • Online Add I RGB
  • new ad
  • advt tsh 1

 

यानिमित्ताने सकाळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे व तालुकाप्रमुख विजू मास्तर यांच्या हस्ते शहरातील गतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांना फळे व बिस्कीटे वाटप करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना शहर युवा पदाधिकारी आकाश परदेशी यानी केले होते. यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख नितीन निळे, रामचंद्र परब, शिक्षकसेनेचे तालुका अध्यक्ष संदीप बोरसे, शाखाप्रमुख नाना जोगी, युवासेनेचे उपशहराधिकारी निखिल बागुल, युवासेना सोशल मिडिया प्र. गौरव बोरसे, सनी परदेशी, भरत जाधव, निलेश सुतार, कुणाल पाटील, नरेंद्र पाटील, शिवदत्त पाटील, निलेश चौधरी, शुभम बडगुजर, विनय पोतले, सागर माळी, तुषार पाटील, राहुल अहिरे, यांच्यासह युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.