राजकीय, रावेर

ना. महाजन यांचे नाथाभाऊंना खुले चॅलेंज ! ( व्हिडीओ )

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

रावेर प्रतिनिधी । राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना खुले आव्हान दिल्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

Akshay Trutiya

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा रावेरात झाली. याप्रसंगी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, नाथाभाऊ..तुम्हाला माझे खुले चॅलेंज आहे…रक्षा खडसेला सार्वधिक लिड माझ्या जामनेर विधासभा मतदारसंघा पेक्षा जास्त देऊन दाखवा…! लागेल तर आताच पैज लावण्याचे आव्हान त्यांनी दिले. या माध्यमातून ना. गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्यासोबतच्या मतभेदांना पूर्णपणे मुठमाती दिल्याचे स्पष्ट झाले असून याचा लाभ खासदार रक्षाताई खडसे यांना होणार असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील अलीकडच्या कालखंडातील मतभेद हे संपूर्ण महाराष्ट्रत सर्वश्रुत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू होतांनाच दोन्ही मान्यवरांनी एकोप्याचा सुर लावला आहे. यावरच आज गिरीशभाऊंनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यांचा जामनेर हा विधानसभा मतदारसंघ रावेरात येत असून राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो. येथूनच थेट खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघापेक्षा जास्त लीड देण्याचे आव्हान देऊन गिरीश महाजन यांनी भाजपमधील एकजुटीचा त्यांच्या स्टाईलने संदेश दिल्याचे मानले जात आहे.

पहा : ना. गिरीश महाजन यांनी खडसेंना नेमके कोणते आव्हान दिले ते !

Leave a Comment

Your email address will not be published.