जामनेर, राजकीय

जिल्ह्यातील सर्व प्रलंबित ,नवीन विकासाची कामे मार्गी लावणार : गिरीष महाजन

शेअर करा !

WhatsApp Image 2019 06 11 at 8.08.58 PM

जामनेर (प्रतिनिधी) साडेतीन महीन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत, पालकमंत्री म्हणुन अत्यंत कमी वेळ हातामधे असुन जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मिळालेल्या जबाबदारीचा जास्तीत-जास्त प्रलंबीत आणि नव्याने आवश्यक असलेल्या सर्व विकासाच्या कामांसाठी उपयोग करणार असल्याचे आश्वासन उपस्थित विशाल जनसमुहाला नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

  • spot sanction insta
  • advt tsh flats
  • Sulax 1

जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रथमच गिरीश महाजनांचे मतदारसंघात आगमन झाले. जळगावमार्गे जामनेरकडे येत असतांना पालकमंत्र्यांचे रस्त्यात ठिक-ठिकाणी पदाधिकारी,कार्यकर्त्यांद्वारा भव्य स्वागत करण्यात आले. शहरातही ढोल-ताशांच्या व फटाक्यांच्या आतीषबाजीत शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पहार,पुष्पगुच्छ,पेढे भरवुन अभुतपुर्व असे स्वागत केले. छोटेखानी मिरवणुकीनंतर निवासस्थानी जमलेल्या विशाल जनसमुहासमोर पालकमंत्र्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी नगराध्यक्षा साधना महाजन,नवनिर्वाचीत खासदार उन्मेश पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील,शिक्षणसंस्थेचे सचिव जितु पाटील,प्रा शरद पाटील,छगनराव झाल्टे, पुखराज डांगी,राजु कावडीया,विलास पाटील,शितल सोनवणे,कमलबाई महाजन,मंगला माळी,डॉ सुनीता पाटील, निता सुहास पाटील,डॉ. प्रशांत भोंडे आदी होते. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमधे भाजप-सेनायुती खानदेशातील सर्व तर राज्यभरात”दोनशेच्या वर”जागा केवळ विकास कामांच्या बळावर जिंकणार असल्याचे भाकीत व्यक्त करून राज्यात केवळ नकारात्मकतेचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस आघाडीला यावेळी पन्नासही जागा मिळणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगीतले.पंधरा हजार कोटी रुपये खर्च करून सर्व प्रलंबित सिंचनाच्या योजना मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न रहाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. हातात वेळ कमी असलातरी २०-ट्वेंटी सामन्यासारखे खेळुन जळगावसह ग्रामीण भागातील विकासाला गती द्यायची असल्याचेही मंत्री महाजन यांनी शेवटी आपल्या भाषणात सांगीतले. खासदार उन्मेश पाटील यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त करून सांगीतले की गिरीश भाऊंनी आता खानदेशातील विकासाची राहीलेली पोकळी भरून काढावी अशी इच्छा व्यक्त केली. दरम्यान छोटेखानी मिरवणुकीद्वारे निवासस्थानी पोहचलेल्या पालकमंत्री गिरीश महाजनांचे”औक्षण” त्यांच्या सुवीद्य पत्नी व नगराध्यक्षा साधना महाजन यांनी पेढे भरवुन केले. याप्रसंगी श्रीराम महाजन, उपनगराध्यक्ष अनीस शेख, राजधर पांढरे, खलीलभांजा, बाबुराव घोंगडे, बांधकामसभापती महेंद्र बावीस्कर, भागवत पाटील, आतीष झाल्टे, समाधान वाघ,सदाशिव माळी,अॅड प्रकाश पाटील, संतोष बारी,नितीन झाल्टे, दिपक तायडे,ज्ञानेश्वर शिंदे, मुरलीधर पाटील,डॉ राजेश सोनवणे,बाळु चव्हाण, अक्षय-विनय पाटील आदी अनेक पदाधिकारी,नेते, कार्यकर्ते,नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.