जामनेर, राजकीय

ना. महाजन यांना पालकमंत्रीपद मिळाल्याने जामनेरात जल्लोष

शेअर करा !

WhatsApp Image 2019 06 07 at 19.38.14

जामनेर (प्रतिनिधी) । राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने ना. गिरीष महाजन यांचे अभिनंदन म्हणून जामनेरमधे ढोल ताशांच्या गजरात फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.

advt tsh 1

यावेळी नगराध्यक्षा साधना महाजन, संध्या पाटील, शिवाजी सोनार, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष अनिस शेख,गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, अँड.सितेश साठे, प्रा.शरद.पाटील आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले. शेवटच्या टप्प्यात का होईना जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाची कामे मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून.नागरिकांमधून स्थानिक नेते जिल्हयाला पालकमंत्री म्हणून लाभल्याने समाधान व्यक्त करत आहे.