पाचोरा

पाचोरा येथे ना. गिरीश महाजन यांचे स्वागत

शेअर करा !

girish mahajan swagat pachora

पाचोरा प्रतिनिधी । नुकसानग्रस्त शिवाराच्या पाहणीसाठी येथे आलेले पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांचे नगरपालिकेतर्फे स्वागत करण्यात आले.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत वृत्त असे की, राज्याचे वैधकिय व जलसंपदा मात्र तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन हे आज भडगाव तालुक्यातील वडजी-पिचर्डे येथे पहाणी करणार आहेत. या अनुषंगाने ना गिरीश महाजन याचे रात्री उशिरा पाचोरा येथे शासकीय विश्रामगृहावर आले होते. आज सकाळी ९ वा शासकीय विश्रामगृह येथे आ. किशोर पाटील, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे व प्रांताधिकारी राजेंद्र कचरे पाचोरा तहसीलदार कैलास चावंडे, भडगाव तहसीलदार गणेश मरकडं कृषी अधिकारी दीपक ठाकूर बांधकाम विभागाचे डी. एम. पाटील आदींसोबत त्यांनी बैठक केली.

या वेळी पाचोरा नगरपालिकेतर्फे नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक सतीश चडे, नगरसेवक वाल्मीक पाटील आदींच्या हस्ते पालकमंत्री गिरीश महाजन याचा सत्कार करण्यात आला. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे, अमोल शिंदे, पं.स. सभापती, माजी सभापती अ‍ॅड दिनकर देवरे, डॉ संजीव पाटील, बालाजी ग्रुपचे नंदू पाटील ,राकेश पाटील, अ‍ॅड अनुराग काटकर, नंदू सोमवंशी, पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, पोलीस कर्मचारी गजानन काळे अमृत पाटील सुनील पाटील ट्राफिक पोलीस बापू महाजन उपस्थित होते.