अमळनेर

उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीस मान्यता दिल्याने ना. महाजन यांचे आभार

शेअर करा !

girish mahajan satkar 1

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पावर आधारित बोहरा येथील साने गुरुजी सहकारी उपसा सिंचन योजनेच्या प्रायोगिक तत्वावर पुनस्थापना व दुरुस्तीच्या ११.४९ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आ. शिरीष चौधरी यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले.

advt tsh 1

मुंबई येथे पार पडलेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत बोहरा सिंचन योजनेच्या दुरुस्तीस मान्यता देण्यात आली आहे. याबाबत आमदार चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की,या मान्यतेसाठी आपण २०१६ पासून सतत पाठपुरावा केला होता. जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन तसेच जलसाठा आणि जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री ना. विजय शिवतारे यांना वेळोवेळी निवेदने देऊन दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. संबंधीत मागणीची दखल घेत ना. शिवतारे यांनी मुंबई येथे मंत्रालयातील त्यांच्या दालनात संबधित विभागाची बैठक बोलावून या बैठकीत ना शिवतारे यानीं दुरुस्तीसाठी त्वरित निधी उपलब्ध करण्याचे आदेश दिले होते. यानंतर देखील आपण ना महाजन यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने त्याचेच फलित म्हणून या योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असून यामुळे आपल्या मतदार संघातील मोठा प्रश्‍न सुटला असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, तसेच ना महाजन यांची जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार आ चौधरी यांनी केला. याप्रसंगी नगरसेवक धनंजय महाजन व शामकांत पाटील उपस्थित होते.