जामनेर, राजकीय

…म्हणून मला इतक्या ठिकाणाहून निवडणूक लढण्याचे आमंत्रण येत आहेत- ना. महाजन (व्हिडीओ)

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

जळगाव प्रतिनिधी । अजितदादा म्हणतात बारामतीला ये…किशोरआप्पा म्हणतात पाचोर्‍याला ये…तर गोटे म्हणतात धुळे येथून लढा…यामुळे मला खूपच आमंत्रण येत असल्याचे सांगत आज जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी विरोधकांची खिल्ली उडविली.

  • linen B
  • NO GST advt 1

आज जळगाव येथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यात ना. गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजपच्या विजयरथाने विरोधकांना धडकी भरली असून त्यांना यात काही तरी घोटाळा असल्याचे दिसून येत आहे. यातच विरोधकांनी पाचोरा, बारामती, धुळे येथून लढण्याचे आव्हान दिले आहे. आपण हे आव्हान स्वीकारल्याचे ना. गिरीश महाजन म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांची जबाबदारी आपल्याकडे दिली असून या आठही जागा भाजपच जिंकणार असल्याचा दावा केला.

पहा :- ना. गिरीश महाजन यांनी विरोधकांच्या आव्हानाबाबत केलेली टोलेबाजी.

Leave a Comment

Your email address will not be published.