राष्ट्रीय

ज्येष्ठ नाटककार गिरीश कर्नाड कालवश

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

girish karnad बंगळुरू वृत्तसंस्था । ज्येष्ठ लेखक, नाटककार व अभिनेते गिरीश कर्नाड (वय ८१) यांचे आज पहाटे निधन झाले.

  • Online Add I RGB
  • vignaharta
  • new ad
  • advt tsh 1

गिरीश कर्नाड हे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणून गणले जात होते. त्यांना ज्ञानपीठसह पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते. आज पहाटे त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांचा जन्म माथेरान येथे झाला होता. त्यांची अनेक नाटके देश-विदेशात गाजली होती. यांची अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला होता. तर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनयदेखील केला होता. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंश वृक्ष (१९७२), काडू (१९७४), ओन्दानुंडू कालाडल्ली (१९७८) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि गोधुली (१९८०) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे. याशिवाय उंबरठा या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाने साहित्य, नाटक व चित्रपट क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.