कोर्ट, क्राईम, धुळे

घरकुल घोटाळ्यातील आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी (व्हीडीओ)

शेअर करा !

c05ea6d7 42ea 426d ad27 afcdc488e7d9

धुळे प्रतिनिधी । घरकूल प्रकरणी शिक्षा झालेल्या सर्व आरोपींना आज सकाळी नाशिक येथील कारागृहात रवाना करण्यात आले. याप्रसंगी नातेवाईक आणि समर्थकांची गर्दी होती. तर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता.

advt tsh 1

याबाबत वृत्त असे की, घरकूल प्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी निकाल लागून यात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह अन्य ४८ आरोपींना शिक्षेसह दंड ठोठावण्यात आला आहे. आरोपींमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांचादेखील समावेश आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास या सर्व आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलविण्यात आले. तर रूग्णालयातील आरोपींना नाशिक येथील रूग्णालयात ठेवणार की ते धुळे रूग्णालयातच उपचार घेणार याची माहिती मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. दरम्यान, यातील काही महिलांना जामीन मिळाला असून अन्य आरोपी धुळे कारागृह तर दहा जण रूग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, घरकूलच्या आरोपींना नाशिक येथे हलविण्याप्रसंगी कारागृहाच्या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. बर्‍याच आरोपींचे कुटुंबिय अथवा समर्थक याप्रसंगी उपस्थित असल्याचे दिसून आले.