क्रीडा, राज्य

गेलच्या सर्वोच्च धावा पण संघ अपयशी

शेअर करा !

gel

नवी दिल्ली प्रतिनिधी । सेंट किट्स येथील वॉर्नर पार्कवर मंगळवारी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट समान खेळण्यात आला. ज्यात जमैका थलावाज आणि सेंट किट्स ऍण्ड नेव्हिस पॅट्रियट्स यांच्यात झालेल्या मॅचमध्ये एकाच दिवशी दोन सर्वाधिक स्कोअरचा विक्रमही मोडला गेला. गेलचं टी-२० क्रिकेटमधले हे २२वं शतक होते. टी-२०मध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही गेलच्याच नावावर आहे.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, वॉल्टनच्या ७३ धावांच्या जोरावर जमैकाने विक्रमी २४१ धावा केल्या. दोघांनी १५ षटकार लगावले. जमैकाने त्या बळावर २० षटकांत चार गडी गमावत २४१ धावा केल्या. कॅरेबियन प्रिमीअर लीगची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. मात्र इतकी मोठी धावसंख्या उभारूनही सेंट किट्स अँड नेवीस पॅट्रिएट्सने जमैकाचा पराभव केला. गेल आणि वॉल्टनच्या फटकेबाजीमुळे जमैकाने सीपीएलमधला सर्वाधिक स्कोअर केला. पण पुढच्या दीड तासामध्येच हा विक्रम मोडला गेला. कॅरेबियन लीगमधला हा सातवा सामना होता. सेंट किट्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गेलने जोरदार फटकेबाजी करत ६२ चेंडूत ७ षटकार आणि १० चौकारांच्या जोरावर ११६ धावा झाल्या. वॉल्टनने ८ षटकार आणि तीन चौकारांसह ७३ धावा केल्या. २० षटकांत २४२ धावांचे आव्हान देऊनही सेंट किट्सने ते पूर्ण केले. डेवॉन थॉमसने ४० चेंडूत ७१ धावांचा डोंगर उभा केल्याने सेंट किट्सचा विजय सोपा झाला.