पाचोरा, भुसावळ, मुक्ताईनगर

गणेश शिंदे यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर

शेअर करा !

09f4b503 d861 459b b1d6 266e08f55b26

पाचोरा (प्रतिनिधी) मुक्ताईनगर येथील संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशनतर्फे ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ व सायंदैनिक साईमतचे प्रतिनिधी गणेश शिंदे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

advt tsh 1

 

संत तुकाराम महाराज युवा फाऊंडेशन ही सामाजिक संस्था असून या संस्थेतर्फे सामाजिक, राजकीय, व्यावसायिक व शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना राष्टीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यंदाचा राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार गणेश शिंदे यांना जाहीर झाला आहे. तसेच ‘केसांवर फुगे’ या गाण्याचे दिग्दर्शक व अभिनेते सचिन कुमावत आणि गायक व अभिनेते अण्णाभाऊ सुरवाडे यांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. दि.१५ जून रोजी दुपारी ४.०० वाजता भुसावळ येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष छबिलदास पाटील व उपाध्यक्ष चेतन पाटील यांनी दिली आहे.